IND vs BAN World Cup 2023 In Marathi : विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास आणि तनजीद तमीम या सलामीवीरांनी बांगलादेशला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. नवव्या षटकात टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. सध्या वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीकडे लक्ष देत आहे. त्यानंतरच हार्दिकची दुखापत किती गंभीर आहे हे कळेल.
बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने फ्रंट शॉट खेळला. हार्दिकने (Hardik Pandya Injured) पायाने हा फटका रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याला दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने मैदानावर हार्दिकवर उपचार केले. तो गोलंदाजी करायलाही उभा राहिला, पण धावू शकला नाही. हार्दिकला बाहेर जावे लागले. त्याच्या जागी विराट कोहलीने (Virat Kohli Bowling) षटक पूर्ण केले.
हेही वाचा – बांगलादेशविरुद्धच्या मॅचपूर्वी रोहित शर्माने पुण्यात 200 किमीच्या स्पीडने गाडी चालवली?
हार्दिकने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याला धावता येत नव्हते. कर्णधार रोहित शर्माने अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीशी संवाद साधला. दोघांनीही रिस्क न घेण्याचे ठरवले. कोहली आणि रोहितने हार्दिकशी बोलून त्याला मैदान सोडण्यास सांगितले. हार्दिकने गोलंदाजीचा हट्ट सोडला आणि तो वैद्यकीय पथकासह बाहेर पडला. हार्दिकने पहिल्या तीन चेंडूमध्ये दोन चौकार खाल्ले होते. विराटने शेवटचे तीन चेंडू टाकले.
या सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश : लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!