IND vs BAN : बांगलादेशचा कॅप्टन बदलला, भारताची पहिली बॉलिंग!

WhatsApp Group

IND vs BAN Toss Update and Playing 11 In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि बांगलादेश पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात बांगलादेशचा कप्तान नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचा नियमित कप्तान शाकिब अल हस दुखापतीमुळे हा सामना खेळू शकत नाहीये. यापूर्वी 1996 मध्ये विश्वचषकाचा सामना पुण्यात झाला होता. यात केनियाचा सामना वेस्ट इंडिजशी झाला आणि मॉरिस ओडुंबेच्या संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती.

रोहित शर्माच्या टीम इंडियाने या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) आतापर्यंत पराभव पाहिलेला नाही. भारताने पहिले तीन सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने तीनपैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. 16 वर्षांपूर्वी विश्वचषकात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता.

एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशविरुद्ध भारताचा वरचष्मा राहिला आहे. 2007 च्या विश्वचषकात टीम इंडियाचा बांगलादेशकडून पहिल्यांदा पराभव झाला होता. त्यानंतर विश्वचषकात भारताला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला नाही. टीम इंडियाने 2011, 2015 आणि 2019 च्या तीनही वर्ल्डकपमध्ये बांगलादेशचा पराभव केला होता.

हेही वाचा – Video : फुटपाथवरून चालणाऱ्या महिलांना धावत्या कारने उडवले, एकीचा जागीच मृत्यू!

गेल्या महिन्यात बांगलादेशने आशिया कपच्या सुपर-4 फेरीच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला होता. बांगलादेशची भारत विरुद्ध 25 वर्षातील ही पहिली वनडे आहे. याआधी 1998 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बांगलादेशचा संघ भारताशी भिडला होता.

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs BAN World Cup 2023)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश – लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कप्तान), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment