IND vs BAN : बांगलादेशला माफी नाहीच! भारतीय संघाचा ‘विराट’ विजय

WhatsApp Group

IND vs BAN World CUP 2023 In Marathi : भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये आपला चौथा विजय नोंदवला आहे. पुण्यात रंगलेल्या सामन्यात भारताने 7 गड्यांनी बांगलादेशला पराभवाचे पाणी पाजले. टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली. लिटन दास आणि तनजीद हसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने भारताला 257 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात विराट कोहलीचे शतक आणि शुबमन गिल, रोहित शर्मा यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने 41.3 षटकात विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये धावांचा पाठलाग करताना विराटचे हे पहिले शतक ठरले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

बांगलादेशचा डाव (IND vs BAN World Cup 2023)

बांगलादेशचे सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 91 धावा फलकावर लावल्या. कुलदीप यादवने तनजीदला पायचीत पकडत ही जोडी फोडली. तनजीदने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची सुंदर खेळी केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने बांगलादेशला धक्के दिेले. त्याने लिटन दासला शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दासने 7 चौकारांसह 66 धावा केल्या. अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने (38) किल्ला लढवला. महमुदुल्लाने शेवटच्या षटकात प्रतिकार केला आणि धावसंख्या अडीचशे धावांच्या जवळ पोहोचवली. बुमराहने अचूक यॉर्कर टाकत त्याला तंबूत पाठवले. महमुदुल्लाने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा केल्या. बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या. भारताकडून बुमराह, जडेजा आणि सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Ravindra Jadeja : पुणेकरांचे पैसे वसूल! सर जडेजाचा अविश्वसनीय झेल, पाहा VIDEO

भारताचा सहज विजय (World Cup 2023 IND vs BAN)

रोहित शर्माने पुन्हा एकदा भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 48 धावांची खेळी केली. हसन महमुदने त्याला पूल शॉटवर बाद केले. शुबमन गिलने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावा केल्या. श्रेयस अय्यरला (19) मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीने केएल राहुलसह मुक्त फलंदाजी केली. विराटने 42व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नसुम अहमदला षटकार ठोकत आपले 48वे वनडे शतक आणि संघाचा विजय साजरा केला. विराटने 6 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या. राहुलने नाबाद 34 धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment