Ravindra Jadeja : पुणेकरांचे पैसे वसूल! सर जडेजाचा अविश्वसनीय झेल, पाहा VIDEO

WhatsApp Group

Ravindra Jadeja Catch vs BAN In Marathi : क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून गणल्या जाणाऱ्या रवींद्र जडेजाने अफलातून कॅच घेत पुणेकरांचे पैसे वसूल केले. बांगलादेशविरुद् महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रंगणाऱ्या वर्ल्डकपच्या सामन्यात (IND vs BAN) जडेजाने गोलंदाजीत कमाल केलीच, शिवाय क्षेत्ररक्षणात जबरदस्त कॅचही टिपला. या सामन्यात बांगलादेशचा कप्तान नजमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशचा नियमित कप्तान शाकिब अल हस दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही.

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 43व्या षटकात पहिली विकेट मिळाली. षटकातील तिसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने जोरकस कट शॉट खेळला. वेगात असलेला चेंडू जडेजाने सूर मारत टिपला. या कॅचनंतर जडेजाने ड्रेसिंग रूमकडे गमतीदार पद्धतीने ‘फिल्डिंग मेडल’साठी विचारणा केली.

हेही वाचा – Irfan Pathan : ‘त्या’ गोष्टीवर इरफान पठाणकडून पाकिस्तानच्या कोचचा समाचार!

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs BAN World Cup 2023)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश – लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कप्तान), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment