IND vs BAN : बांगलादेशचे भारताला 257 धावांचे आव्हान, ओपनर्सकडून काऊंटर अटॅक!

WhatsApp Group

IND vs BAN World Cup 2023 In Marathi : भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ल्डकप 2023चा 17वा सामना पुण्यात खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीमुळे सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी नजमुल हुसेन शांतो कर्णधार आहे. भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. लिटन दास आणि तनजीद हसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बांगलादेशने भारताला 257 धावांचे आव्हान दिले आहे.

तनजीद हसन आणि लिटन दास यांनी आपल्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 91 धावा फलकावर लावल्या. कुलदीप यादवने तनजीदला पायचीत पकडत ही जोडी फोडली. तनजीदने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 51 धावांची सुंदर खेळी केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने बांगलादेशला धक्के दिेले. त्याने लिटन दासला शुबमन गिलकरवी झेलबाद केले. दासने 7 चौकारांसह 66 धावा केल्या. अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने (38) किल्ला लढवला. महमुदुल्लाने शेवटच्या षटकात प्रतिकार केला आणि धावसंख्या अडीचशे धावांच्या जवळ पोहोचवली. बुमराहने अचूक यॉर्कर टाकत त्याला तंबूत पाठवले. महमुदुल्लाने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा केल्या. बांगलादेशने 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या. भारताकडून बुमराह, जडेजा आणि सिराजने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – Ravindra Jadeja : पुणेकरांचे पैसे वसूल! सर जडेजाचा अविश्वसनीय झेल, पाहा VIDEO

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs BAN World Cup 2023)

भारत – रोहित शर्मा (कप्तान), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश – लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कप्तान), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment