IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात ‘मोठे’ बदल; दोघेजण बाहेर!

WhatsApp Group

Team India squad for Bangladesh tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (IND vs BAN) दोन मोठे बदल केले आहेत. त्यांनी वेगवान गोलंदाज यश दयाल आणि स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला वगळले आहे. दोघेही दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. यश दयाल आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी बीसीसीआयने वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि अष्टपैलू शाहबाज अहमदला बदली म्हणून संघात घेतले आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

बीसीसीआयने यश दयालच्या पाठीचा त्रास कायम असल्याचे सांगितले आहे. तर जडेजा अद्याप गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळेच दोघे बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांची न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली. मात्र आता दोघेही बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याने या मालिकेतून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी कुलदीप आणि शाहबाजची बदली करण्यात आलेली नाही. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंडकडून तीन एकदिवसीय मालिका खेळायची आहे. पहिला सामना २५ नोव्हेंबरला होणार आहे.

हेही वाचा – अभिनेते विक्रम गोखलेंच्या मृत्यूची बातमी अफवा! त्यांची मुलगी म्हणते, “कोणत्याही…”

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंह, दीप यादव, अरविंद चहल चहर आणि उमरान मलिक.

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि कुलदीप सेन.

भारताचा बांगलादेश दौरा –

• ४ डिसेंबर, पहिला एकदिवसीय (ढाका) दुपारी १२.३० वाजता
• ७ डिसेंबर, दुसरी वनडे (ढाका) १२.३० वाजता
• १० डिसेंबर, तिसरा एकदिवसीय (ढाका) दुपारी १२.३० वाजता
• १४-१८ डिसेंबर, पहिली कसोटी (चटगाव)
• २२-२६ डिसेंबर, दुसरी कसोटी (ढाका)

बांगलादेशविरुद्धच्या चार दिवसीय सामन्यांसाठी भारत अ संघ –

पहिल्या सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कप्तान), रोहन कुनुमल, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतीत सेठ.

दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कप्तान), रोहन कुनुमल, यशस्वी जयस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतित सेठ, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव, केएस भरत (यष्टीरक्षक).

Leave a comment