Ind vs Ban : ‘त्या’ खेळाडूला रोहितनं बहिणीवरून दिली शिवी..! लोक संतापले; Video व्हायरल

WhatsApp Group

Rohit Sharma Abuses Washington Sundar : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला (Ind vs Ban) एका विकेटने पराभव पत्करावा लागला आहे. सामन्यात एक संधी होती जेव्हा टीम इंडिया हा सामना जिंकू शकली असती. मात्र, एका कॅचच्या गोंधळाने सर्व काही बिघडले, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माची संतप्त प्रतिक्रियाही व्हायरल होत आहे. जेव्हा टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी एका विकेटची गरज होती, तेव्हा दोन मोठ्या चुका झाल्या. येथे यष्टीरक्षक केएल राहुलने प्रथम मेहदी हसनचा सोपा झेल सोडला, ज्याने त्याच्याकडून टीम इंडियाचा विजय हिसकावून घेतला. पण त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरचीही चूक झाली.

बांगलादेशच्या डावाच्या ४३व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर मेहदी हसनने शॉट खेळला तेव्हा चेंडू थर्ड मॅन एरियामध्ये गेला, जिथे वॉशिंग्टन सुंदर क्षेत्ररक्षण करत होता. पण त्याने झेलसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, हे पाहून कर्णधार रोहित शर्मा हादरला आणि ओरडला.

हेही वाचा – Car Accessories : कळलं का? तुमच्या कारमध्ये ‘या’ ५ गोष्टी असल्याच पाहिजेत!

वॉशिंग्टन सुंदर व्यतिरिक्त टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलनेही एक झेल सोडला, तो विकेटकीपिंग करत होता आणि हा झेल त्याच्यासाठी खूप सोपा होता. बांगलादेशला जवळपास ३१ धावांची गरज असताना केएल राहुलने झेल सोडला आणि इथे टीम इंडियाने सामनाही घालवला.

बांगलादेशकडून टीम इंडियाचा पराभव

बांगलादेशने शाकिब अल हसनच्या पाच विकेट्स आणि त्यानंतर अष्टपैलू मेहदी हसन मिराजच्या (नाबाद ३८) बळावर रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एका विकेटने पराभव करून तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेशने ४०व्या षटकात हसन महमूद (०) च्या रूपाने १३६ धावांवर आपली नववी विकेट गमावली पण पुढील सहा षटकांत भारतीय संघाला शेवटची विकेट काढता आली नाही. यात मेहदी हसन (३९ चेंडू, चार चौकार, दोन षटकार) आणि मुस्तफिझूर रहमान (नाबाद १०) यांच्यात अखेरच्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment