IND vs BAN : छोटा पॅकेट बडा धमाका..! इशान किशनची वादळी ‘डबल सेंच्युरी’; पाहा सेलिब्रेशन Video

WhatsApp Group

Ishan Kishan Double Century : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs BAN) इशान किशन हा सर्वात जलद द्विशतक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. याआधी सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने १३८ चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक पूर्ण केले. या सामन्यात इशान किशनने १२६ चेंडूत द्विशतक पूर्ण केले.

द्विशतक पूर्ण करण्यापूर्वी इशान किशन हा सर्वात जलद १५० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. त्याने ११२ चेंडूत १५० धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन हा चटगावमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. याशिवाय तो बांगलादेशविरुद्ध भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. याआधी बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

हेही वाचा – तब्बल १७,५०० रुपयांनी स्वस्त झाला IPhone 13..! जाणून घ्या ‘ही’ बंपर ऑफर

या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. शुबमन गिल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी यावर्षी इशानपूर्वी शतके झळकावली आहेत. इशान किशन १३१ चेंडूत २४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने २१० धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने १६०.३१च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. इशान बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी अभिनंदन केले.

एकदिवसीय क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद द्विशतक आहे आणि हा एक विश्वविक्रम आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. इशानपूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा (३ वेळा) यांनी भारतासाठी द्विशतके झळकावली आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment