Yashasvi Jaiswal Catch : भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटी (IND vs BAN 2nd Test)सामन्यात आकाश दीपने झाकीर हसनला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. झाकीरला खातेही उघडता आले नाही आणि तो जयस्वालकरवी झेलबाद झाला. बांगलादेशची पहिली विकेट 9व्या षटकात पडली. झाकीरने 24 चेंडूंचा सामना केला पण त्याला खातेही उघडता आले नाही. आकाश दीपने झाकीरला स्लिपमध्ये झेलबाद केले. जयस्वालच्या झेलचे खूप कौतुक होत आहे.
आकाशने चौथ्या स्टंपवर चेंडू टाकला, फलंदाज बचावासाठी गेला, पण चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि गल्लीच्या उजव्या बाजूला गेला, जिथे जयस्वाल उभा होता. जयस्वालने उजवीकडे सूर मारत अप्रतिम झेल घेतला. मात्र, झेलबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अशा स्थितीत पंचांनी निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. वारंवार टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने आऊटचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Jaiswal pounces like a panther to take the catch! 👌#INDvBAN #JioCinemaSports #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/cfg394XfMm
— JioCinema (@JioCinema) September 27, 2024
हेही वाचा – अर्थ मंत्रालयाचा इशारा! शेअर बाजार इतका कोसळणार आहे की…
दोन्ही संघांची Playing 11
भारत
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खलिद अहमद.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!