IND vs BAN : स्वस्तात आऊट झाल्यावर विराटचं भांडण..! मध्ये आला ‘हा’ खेळाडू; पाहा Video

WhatsApp Group

Virat Kohli Fight With Bangladesh Players : बांगलादेशविरुद्धची मीरपूर कसोटीही (IND vs BAN 2nd Test) भारताने जिंकली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारत हा सामना गमावू शकतो असे वाटत होते, परंतु श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विनच्या भागीदारीने टीम इंडियाची शान वाचवली आणि भारताने हा सामना ३ विकेटने जिंकला. यासह टीम इंडियाने मालिका २-० ने जिंकली आहे. टीम इंडियाच्या या विजयाचे नायक रवीचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर होते, ज्यांनी संघाला संकटातून बाहेर काढले आणि अखेरीस सामना जिंकला.

हरता हरता जिंकली टीम इंडिया

या सामन्यात बांगलादेशने भारताला १४५ धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात ४५-४ अशा स्कोअरने केली होती, पण बघता बघता त्याचे ३ विकेट गेले. अशा स्थितीत भारतावर पराभवाचे संकट ओढावले होते. अखेरीस श्रेयस अय्यर (२९ धावा), रवीचंद्रन अश्विन (४२ धावा) यांच्या अर्धशतकी भागीदारीने (७१ धावा) बांगलादेशचे स्वप्न भंगले.

हेही वाचा – Aadhaar Card : तुम्ही १० वर्षांपूर्वी बनवलंय आधार कार्ड? ‘हे’ लगेच करा, नाहीतर…!

विराटची वादावादी

सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी विराट कोहलीची विकेट पडली तेव्हा मैदानावर जोरदार भांडण झाले. बाद झाल्यानंतर विराट कोहली बांगलादेशी खेळाडूशी भिडला, असे घडले की शाकिब अल हसनला बचावासाठी यावे लागले. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहली केवळ १ धावा करून बाद झाला, मोमिनुल हसनने मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर विराट कोहलीचा झेल टिपला. विराट कोहली आऊट झाल्यावर बांगलादेशी खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. यादरम्यान बांगलादेशी खेळाडू आणि विराट कोहली यांच्यात काही वाद झाला.

विराट कोहली तिथेच क्रीजवर थांबला आणि बांगलादेशी खेळाडूंवर चिडला. दरम्यान बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन विराट कोहलीच्या जवळ आला आणि त्याच्याशी बोलला. त्यानंतर विराट कोहलीने त्याला या खेळाडूबद्दल सांगितले आणि त्यानंतर प्रकरण निवळले.

भारताचा बांगलादेश दौरा –

  • पहिली वनडे : बांगलादेश १ विकेटने विजयी
  • दुसरी वनडे : बांगलादेश ५ धावांनी विजयी
  • तिसरी वनडे : भारत २२७ धावांनी जिंकला
  • पहिली कसोटी : भारत १८८ धावांनी विजयी
  • दुसरी कसोटी : भारत ३ गडी राखून विजयी

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment