रवींद्र जडेजाचा ‘मोठा’ पराक्रम! बनला पहिला डावखुरा भारतीय फिरकी गोलंदाज

WhatsApp Group

Ravindra Jadeja : भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथे सुरू असलेल्या कसोटीत रवींद्र जडेजाने तीन विकेट घेत धुमाकूळ घातला आहे. त्याने सामन्याच्या पाचव्या दिवशी बांगलादेशच्या दुसऱ्या डावात तीन बळी घेतले. जडेजाने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो (19), लिटन दास (1) आणि शाकिब अल हसन (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याच्या एकूण कसोटी बळींची संख्या 303 वर पोहोचली आहे. यासह जडेजा कसोटीत 300 बळी घेणारा पहिला डावखुरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सहा भारतीय गोलंदाजांनी 300 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत, परंतु त्यापैकी एकही डावखुरा फिरकी गोलंदाज नाही.

जडेजाच्या आधी अनिल कुंबळे, आर अश्विन, कपिल देव, हरभजन सिंग, इशांत शर्मा, आणि झहीर खान यांनी 300 हून अधिक कसोटी बळी घेतले आहेत. या यादीत प्रवेश मिळवणारा जडेजा हा नवीनतम गोलंदाज आहे आणि तो पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. जडेजानंतर बिशनसिंग बेदीचा क्रमांक लागतो आणि त्यांनी 266 विकेट घेतल्या होत्या.

हेही वाचा –“RCB ने रोहित शर्माला कॅप्टन…”, मोहम्मद कैफचा खळबळजनक सल्ला! पाहा Video

एवढेच नाही तर कसोटीत 3000 हून अधिक धावा करणारा आणि 300 हून अधिक बळी घेणारा जडेजा हा चौथा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी, आर अश्विन आणि शेन वॉर्न यांनी ही कामगिरी केली आहे. व्हिटोरीने कसोटीत 4531 धावा केल्या होत्या आणि 382 बळी घेतले होते. तर अश्विनने 3423 धावा केल्या असून 527 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्नच्या नावावर कसोटीत 3154 धावा आणि 708 विकेट आहेत. जडेजाने 3130 धावा केल्या असून 303 विकेट्स घेतल्या आहेत.

या फॉरमॅटमध्ये 300 बळी आणि 3000 धावा पूर्ण करणारा तो 11वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. जडेजापूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार कपिल देव (434 विकेट आणि 5248 धावा) आणि अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (522 विकेट आणि 3422 धावा) यांनी ही कामगिरी केली आहे. कानपूर कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, भारताने बांगलादेशला 233 धावांत गुंडाळले होते आणि त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत 34.4 षटकांत नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 285 धावा केल्या आणि त्यानंतर 52 धावांच्या आघाडीसह डाव घोषित केला. यासह भारताने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 50, 100, 150, 200 आणि 250 धावांची नोंद केली.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment