VIDEO : ‘मुझे क्यों मार रहे हो’, संतप्त ऋषभ पंत आणि बांगलादेशी खेळाडूमध्ये बाचाबाची, पाहा!

WhatsApp Group

IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भांडण पाहायला मिळाले. ऋषभ पंत आणि बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास मैदानावर एकमेकांशी भिडले. टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान पंत क्रीजवर उपस्थित होता, दासच्या एका कृतीमुळे तो संतापलेला दिसला.

हसन महमूदच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने पहिल्या तासातच तीन विकेट गमावल्या. रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली बाद झाले, तरीही ऋषभ पंतने आक्रमकता कायम ठेवली. भारताच्या पहिल्या डावात बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद 16वे षटक घेऊन आला. तस्किन अहमदने या षटकातील तिसरा चेंडू भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वालला टाकला.

यानंतर यशस्वी आणि पंत यांनी मिळून एक धाव घेतली. एक धाव घेतल्यानंतर बांगलादेशी क्षेत्ररक्षकाचा एक थ्रो ऋषभ पंतच्या पॅडला लागला. ऋषभ पंतच्या पॅडला स्पर्श केल्यानंतर चेंडूची दिशा बदलली, आणि ते दुसऱ्या धावेसाठी धावले. याच्यावर बांगलादेशचा लिटन दास नाराज दिसला. त्याने पंतकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावरून पंत आणि दास यांच्यात वाद सुरू झाला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ऋषभ पंत आणि लिटन दास यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी भारताने लंचपर्यंत 88 धावांवर तीन विकेट गमावल्या. वेगवान गोलंदाज हसन महमूदने भारताच्या तिन्ही विकेट घेतल्या. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन गिल स्वस्तात बाद झाले. तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment