T20 World Cup 2022 Virat Kohli Catch : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) ६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. शेवटच्या दोन षटकात संघाला विजयासाठी फक्त १६ धावांची गरज होती. त्यांच्या ६ विकेट्स शिल्लक होत्या. इथून विराट कोहली आणि टीम इंडियाने सामना पालटला.
अचूक थ्रोवर डेव्हिड धावबाद
१८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीच्या अचूक थ्रोवर टीम डेव्हिड धावबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी फिनिशरची भूमिका बजावणारा डेव्हिड २ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. हर्षल पटेलच्या चेंडूवर जोस इंग्लिसने बाजूने चेंडू खेळला आणि धाव चोरण्याचा प्रयत्न केला. पण विराट कोहलीने चेंडू उचलला आणि हवेत उडी मारून विकेटवर आदळला. टीम डेव्हिडने रिप्ले पाहण्यासाठीही थांबला नाही आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
This throw is not everyone's cup of tea 💯.
Virat Kohli 👑pic.twitter.com/nr6uOMa0mx#AUSvIND || #T20WorldCup
— ɪʟɪᴀꜱ🍷 (@Ilias69__) October 17, 2022
हेही वाचा – T20 World Cup 2022 : शेवटच्या ओव्हरमध्ये ४ विकेट..! भारताचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय
Australia dug out can't believe it 🥵#virat #kohli #viratkohli #vk pic.twitter.com/sLePQLNli5
— Sahil🎭 (@sahil_18vk) October 17, 2022
Unbelievable😳
What a catch by Virat Kohli.#INDvsAUS #T20WorldCup#ViratKohli pic.twitter.com/5tHRoNy8MU— Rekha (@sameera2802) October 17, 2022
भारी कॅच
त्यानंतर शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने भारताला ४ विकेट मिळवून दिल्या. यातील तिसऱ्य़ा चेंडूवर त्याने पॅट कमिन्सला बाद केले. कमिन्सने लाँग ऑनच्या दिशेने उंच फटका खेळला. चेंडू सीमापार जाणार इतत्यात विराटने हवेत उडी मारून तो पकडला. त्याचा हा कॅच पाहून सगळे स्तब्ध झाले.