IND vs AUS 3rd T20 : कार्तिकचा हात लागून बेल पडली, तरीही मॅक्सवेल रनआऊट..! वाचा नियम

WhatsApp Group

Glenn Maxwell Run Out : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. मालिकेतील निर्णायक सामन्यात त्याने ११ चेंडूत ६ धावा केल्या आणि तो रंजक पद्धतीने रनआऊट झाला. मात्र, हे रनआऊट वेगळे होते आणि पंचांनी त्याला कसा आऊट दिला हे समजणे खेळाडूंसह प्रेक्षकांना कठीण गेले. दिनेश कार्तिकच्या चुकीमुळे मॅक्सवेलला जीवदान मिळण्याची खात्री होती, पण कार्तिक नशीबवान होता की भारताला विकेट मिळाली.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि युझवेंद्र चहल ऑस्ट्रेलियन डावातील आठवे षटक करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅक्सवेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू लेग साइडला गेला. त्याने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षर पटेलने अचूक थ्रो मारला. मॅक्सवेलचे बाद होणे निश्चितच होते, पण रिप्लेमध्ये कार्तिकचा हात चेंडूपूर्वी स्टंपला लागल्याचे दिसून आले. यानंतर मॅक्सवेलच्या बाद होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती.

हेही वाचा – कुटुंबानं १८ महिने घरात ठेवला मृतदेह..! लोकांना सांगायचे, “ते कोमात आहेत”

तिसर्‍या पंचाने अनेक वेळा रिप्ले पाहिला, ज्यामध्ये कार्तिकच्या हातामुळे फक्त एक बेल पडल्याचे दिसून आले. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर दुसऱ्या बेलची लाइट दिसली आणि ती स्टम्पपासून वेगळी झाला. यामुळे मॅक्सवेलला आऊट देण्यात आले. मात्र, मॅक्सवेलला यावर विश्वास बसला नाही आणि तो निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २० षटकात ७ बाद १८६ धावा केल्या. सलामीवीर कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ तर टिम डेव्हिडने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ५४ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने ३ बळी घेतले.

हेही वाचा – VIDEO : “लोकांच्या भावनेशी खेळू नकोस..!”, धोनीचा ‘तो’ प्रकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!

नियम काय आहे?

क्रिकेटच्या नियमांनुसार, चेंडू स्टम्पला लागल्यापूर्वी बेल्स वेगळ्या झाल्या असतील, तेव्हा चेंडू स्टम्पला लागल्यानंतर किमान एक स्टम्प जमिनीवरून उखडला गेला पाहिजे. या सामन्यात अक्षरच्या थ्रोने एकही स्टम्प उखडला नाही, पण कार्तिकने दोन्ही बेल्स पाडलेल्या नव्हत्या. अशा स्थितीत दुसरी बेल अक्षरच्या थ्रोने खाली पडली आणि अंपायरने मॅक्सवेलला आऊट दिला.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment