IND vs AUS T20 World Cup 2024 : कप्तान रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने टी-20 वर्ल्डकप 2024 च्या सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी मात दिली. सेंट लुसियात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 206 धावांचे आव्हान दिले. पण ऑस्ट्रेलियाला 181 धावांपर्यंत पोहोचता आले. भारताकडून रोहितने सलामीला येत 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 92 धावांची खेळी केली. रोहितचे शतक थोडक्यात हुकले.
रोहितशिवाय सूर्यकुमार यादवने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावा केल्या. तर शिवम दुबेने 28 आणि हार्दिक पांड्याने 27 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि मार्कस स्टॉइनिसने 2-2 विकेट्स घेतल्या.
2007 ✅
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 24, 2024
2014 ✅
2016 ✅
2022 ✅
𝟐𝟎𝟐𝟒 ✅
Australia can't pass India's NRR, so India are through to their 5th semi-final at the men's T20 World Cup! pic.twitter.com/v8qdfPYqlO
हेही वाचा – VIDEO : रोहित शर्माचं शतक हुकलं..! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारले 8 षटकार; स्टार्कला तोडलं!
𝙏𝙧𝙖𝙫𝙞𝙨 𝙃𝙚𝙖𝙙 𝙘𝙖𝙪𝙜𝙝𝙩 𝙗𝙮 𝙍𝙤𝙝𝙞𝙩! Every #TeamIndia fan waited for this moment! 💙#JaspritBumrah gets the biggest breakthrough! Is that the game for the #MenInBlue? 👀
— Star Sports (@StarSportsIndia) June 24, 2024
𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝟖 👉 #AUSvIND | LIVE NOW | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/EeCC75CFN3
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने कडवा प्रतिकार केला. ट्रॅव्हिस हेडने 9 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावा, मिचेल मार्शने 37 धावांची खेळी केली. पण त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, कुलदीप यादवने 2, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा