राहुल द्रविडचा मोठा निर्णय! सूर्यकुमार यादवबाबत घेतला ‘असा’ निर्णय

WhatsApp Group

Rahul Dravid On Suryakumar Yadav : आशिया चषक स्पर्धेत विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता नव्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवार 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याने विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादवबद्दल असे काही मत दिले, ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेच्या एक दिवस आधी प्रशिक्षक द्रविडने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, “27 तारखेची काळजी करण्याची गरज नाही, सूर्या जागतिक संघाचा एक भाग आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत. आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत कारण त्याच्याकडे निश्चितच आश्चर्यकारक गुणवत्ता आहे आणि आपण सर्वांनी त्याच्याकडे असलेली क्षमता पाहिली आहे. आपण सर्वांनी त्याला टी-20 क्रिकेटमध्ये पाहिले आहे.

हेही वाचा – World Cup 2023 : 48 तासात नशीब पालटलं, Swiggy डिलिव्हरी बॉयची वर्ल्डकप संघात एन्ट्री!

पहिल्या दोन वनडेसाठी संघ :

केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, तिलक वर्मा, प्रसिध कृष्णा, रवीचंद्रन. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वनडेसाठी संघ :

रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, अक्षर पटेल (फिटनेस नंतर), रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment