IND vs AUS : बुमराहचं यॉर्कररस्त्र..! ‘त्या’ भयानक चेंडूचं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनकडून कौतुक; पाहा VIDEO

WhatsApp Group

IND vs AUS 2nd T20 : एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले तर फलंदाजाची प्रतिक्रिया काय असेल हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज गोलंदाजाकडं प्रतिकूल नजरेनं पाहतो, पण नागपूरात खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात वेगळी घटना पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने जे केले ते पाहून सर्वजण चकित झाले. भारताविरुद्ध नागपुरात झालेल्या ८-८ षटकांच्या सामन्यात फिंच बुमराहच्या भारी यॉर्करने क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर फिंचने बुमराहचे बॅटवर टाळी मारत कौतुक केले.

वास्तविक, ओल्या मैदानामुळे झालेल्या या छोट्या सामन्यात जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आरोन फिंचला क्लीन बोल्ड केले. बुमराहने धोकादायक यॉर्कर टाकला, ज्यावर फिंच फटतका खेळण्यास निरुत्तर झाला आणि चेंडू लेग-स्टंपवर गेला. यानंतर फिंच नक्कीच निराश झाला होता, पण त्याने जसप्रीत बुमराहसाठी टाळ्या वाजवल्या कारण असा चेंडू कोणासाठीही खेळणं सोपं नव्हतं.

हेही वाचा – आमिर खानचा ‘मराठमोळा’ जावई नक्की आहे तरी कोण? केलं होतं न्यूड फोटोशूट

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांनी मैदानात परतला आहे. त्यानं दोन षटकं टाकली आणि एक गडी बाद केला. त्यानं २३ धावा दिल्या, पण त्याच्या यॉर्कर गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या सामन्यात भारताने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ षटकात ५ बाद ९० धावा केल्या. मॅथ्यू वेडनं ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ७.२ षटकात ४ गडी गमावत आव्हान गाठले. कप्तान रोहित शर्माने २० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४६ धावा केल्या. दिनेश कार्तिकने २ चेंडूत एक षटकार आणि एका चौकारासह नाबाद १० धावा केल्या. आता मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. शेवटचा आणि तिसरा सामना २५ सप्टेंबरला हैदराबादला खेळवला जाईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment