Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपमध्ये अनोखी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 92 धावा ठोकल्या. रोहितचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला यॉर्करवर त्रिफळाचीत केले.
पण रोहितने याच स्टार्कची लक्षात ठेवण्यासारखी धुलाईही केली. सामन्याच्या तिसऱ्या षटकात रोहितने स्टार्कला चार षटकार आणि एक चौकार ठोकला. स्टार्कला या षटकात एकूण 29 धावा आल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये स्टार्कचे हे सर्वात महागडे षटक ठरले.
6️⃣,6️⃣,4️⃣: The Hitman takes the aerial route 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) June 24, 2024
2️⃣9️⃣ off that #MitchellStarc over and #RohitSharma takes #TeamIndia off to a flyer! 💪🏻
𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝟖 👉 #AUSvIND | LIVE NOW | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/3mYubPm6jU
हेही वाचा – एका दिवसात 60 सिगारेट ओढायचे नाना पाटेकर! सांगितलं, अंघोळ करताना सुद्धा एका हातात…
सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कप्तान मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीच स्वीकारली. भारताचा सलामीवीर विराट कोहली जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराटने पाच चेंडू खेळले पण त्याला खाते उघडता आले नाही. विराटनंतर ऋषभ पंत 15 धावांची भर घालून बाद झाला, पण त्याने आक्रमक रुप धारण केलेल्या रोहितला साथ दिली.
रोहित शर्मा आज रुद्रावतारात दिसला. त्याने फक्त 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. रोहितने 41 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 92 धावा केल्या. सोबत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 धावाही पूर्ण केल्या.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा