ऑस्ट्रेलियाचा दुसरा मॅक्सवेल, मूळचा इंग्लंडचा, दोन वर्ल्डकप जिंकलेला..जोश इंग्लिस!

WhatsApp Group

वर्ल्डकपच्या चार दिवसानंतर सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत ज्युनियर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) टी-20 मालिका खेळत आहे. विशाखापट्टणमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांचे आव्हान दिले. यात ऑस्ट्रेलियन विकेटकीपर जोश इंग्लिसने 50 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकारांसह 110 धावांची दणकेबाज इनिंग खेळली. हा तोच इंग्लिस ज्याला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जास्त बॅटिंग करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे इंग्लिस (Josh Inglis) अनेकांना कळला नाही. पण ऑस्ट्रेलियाने त्याच्यामध्ये गुंतवणूक केली. आणि जबरदस्त विश्वास दाखवला. इंग्लिसनेही आता जास्त वेळ न काढता पहिल्याच टी-20 मॅचमध्ये आपली गुणवत्ता सर्वांसमोर आणली. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन्स पुढच्या मिशनकडे वळले आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया कोणती टीम आणणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पण या स्पर्धेसाठी पहिला अर्ज जोस इंग्लिसने भरला आहे. ग्लेन मॅक्सवेलसारखी झटपट इनिंग खेळण्यासाठी इंग्लिस प्रसिद्ध आहे. लिस्ट ए, काऊंटी आणि टी-20 ब्लास्टमध्ये इंग्लिसने बरेच नाव कमावले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन स्क्वॉडचाही इंग्लिस भाग होता.

हेही वाचा – तोंडल्याच्या शेतीमधून लाखोंची कमाई करताय शेतकरी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

इंग्लिसचा जन्म इंग्लंडमधील लीड्स येथे झाला आणि वयाच्या 14व्या वर्षी तो त्याच्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला गेला. तो 2021च्या टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लिस हा यंदाचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचाही सदस्य आहे. त्यामुळे त्याच्या करियरमध्ये दोन वर्ल्डकप जिंकले, असा उल्लेख नक्कीच असेल.

यंदाच्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लिसने मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने विकेटच्या मागे पाच बळी घेतले. त्याने श्रेयस अय्यर (4), केएल राहुल (66), रवींद्र जडेजा (9), सूर्यकुमार यादव (18), मोहम्मद शमी (6) यांचे कॅच घेतले. त्यामुळे 28 वर्षीय इंग्लिस वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment