IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया पराभूत झाली आहे. भारताला ९ गड्यांनी मात खावी लागली. दोन दिवसांत दोनदा ऑलआऊट झालेल्या भारताने कांगारूंसमोर अवघ्या ७६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या दिवशी एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या आणि चेतेश्वर पुजारा किल्ला लढवत राहिला. पुजाराला १४२ चेंडूत ५९ धावा करता आल्या नसत्या तर भारताला १६३ धावांपर्यंत मजल मारता आली नसती. फिरकीपटूंविरुद्धच्या बचावावर विसंबून त्याने फॉरवर्ड आणि बॅकफूटवरून काही चांगले शॉट्स खेळले.
सामन्यात 8 विकेट घेणाऱ्या नॅथन लायनवरही पुजाराने लक्ष्यावर हल्ला चढवला. मात्र काही वेळ पुजाराने निर्धाव चेंडू जाऊ दिले. ५२व्या षटकात, कर्णधार रोहित शर्मा नाखूष दिसत होता कारण पुजारा आणि अक्षर पटेल चांगल्या चेंडूंवर प्रहार करत नव्हते. दोघेही क्रीझवर विकेट वाचवण्याचा विचार करत असताना कर्णधार रोहितला मात्र धावा घेणे महत्त्वाचे वाटत होते. अशा स्थितीत त्याने १२वा खेळाडू इशान किशनला ड्रिंक्ससह मैदानात पाठवले आणि दोन्ही खेळाडूंना मोठे फटके मारण्याचा सल्ला दिला.
Players blindly follow the orders of Rohit Sharma like he's their king . They trust him .
– Rahul Dravid#RohitSharma #RohitSharma𓃵#Pujara#INDvsAUSTest pic.twitter.com/JJTOFP0Laz
— Mahesh Kumar (@beingmks_) March 2, 2023
हेही वाचा – WTC Final : ऑस्ट्रेलिया विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये..! टीम इंडिया बाहेर?
मग काय. काही षटकांनंतर चेतेश्वर पुजाराने पुढे जाऊन नॅथन लायनला जबरदस्त षटकार ठोकला. पुजाराने चेंडू स्टेडियमच्या दुसऱ्या स्टॅन्ड्समध्ये पोहोचवला. हा षटकार पाहून ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या रोहित शर्माला खूप आनंद झाला. त्याची प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. पण रोहितचा आनंद फार काळ टिकला नाही कारण काही षटकांनंतर स्टीव्ह स्मिथने नॅथन लायनच्याच चेंडूवर जबरदस्त झेल देऊन चेतेश्वरचा डाव संपवला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!