WTC Final : ऑस्ट्रेलिया विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये..! टीम इंडिया बाहेर?

WhatsApp Group

WTC Final : तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा (IND vs AUS) ९ गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. टीम इंडिया आता संकटात सापडली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा संघही अंतिम फेरीच्या शर्यतीत आहे. त्यांना न्यूझीलंडकडून शेवटची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत पोहोचला होता आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाला. चालू मोसमाचा अंतिम सामना ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर १८ सामन्यांमधला हा ११वा विजय आहे. त्यांना ६८.५२ गुण आहेत. त्यांना ३ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे तर ४ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाविषयी बोलायचे झाले तर हा त्यांचा ५वा पराभव आहे. त्यांनी आतापर्यंत १७ सामने खेळले आहेत. यात १० जिंकले, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याला ६०.२९ टक्के गुण आहेत. या संघाला ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे.

हेही वाचा – Job Interview Tips : इंटरव्यू देताना ‘या’ टिप्स पाळा, तुमची नोकरी होईल पक्की!

जिंकलात तर फायनलमध्ये

श्रीलंकेचा संघ सध्या ५३.३३ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास ते अंतिम फेरीत पोहोचतील. पण सामना अनिर्णित राहिला किंवा पराभव झाला तर त्याला श्रीलंका मालिकेतील निकालाची वाट पाहावी लागेल. सामना अनिर्णित राहिल्यास भारताचा स्कोअर ५८.८० टक्के होईल. दुसरीकडे, पराभव झाल्यास ५६.९४ टक्के गुण असतील.

जर श्रीलंकेच्या संघाने घरच्या मैदानावर झालेल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला तर त्यांना ६१.११ टक्के गुण मिळतील. दुसरीकडे, जर त्याने एक सामना जिंकला तर त्याला ५५.५५ टक्के गुण असतील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment