IND vs AUS : काय झालं हे कुणालाच कळलं नाही, पण रोहित शर्मा OUT झाला होता! पाहा Video

WhatsApp Group

IND vs AUS 3rd ODI Glenn Maxwell Catch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताचा कप्तान रोहित शर्माने जबरदस्त खेळी केली. त्याने 57 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 81 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने त्याचा अद्भूत झेल टिपला.

भारतीय संघ 21व्या षटकात खेळताना (IND vs AUS 3rd ODI) मॅक्लवेलने रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या षटकातील चौथ्या चेंडूवर रोहितने त्याला खणखणीत षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर तो समोर मोठा फटका खेळायला जात होता, पण तुफानी वेगात असलेला चेंडू मॅक्सवेलच्या हातात चिकटला. थोडा वेळ काय झाले, कोणालाच कळले नाही. मॅक्सवेलही चकित झाला. पण रोहितला माघारी परतावे लागले. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी सलग तिसरे अर्धशतक झळकावले. मार्श, स्मिथ आणि लाबुशेन यांनी अनुक्रमे 96, 77, 72 धावांची उत्कृष्ट अर्धशतके झळकावली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 3 तर कुलदीप यादवने 2 बळी घेतले.

हेही वाचा – Mission Raniganj Trailer : अंगावर रोमांच आणतोय अक्षय कुमारच्या चित्रपटाचा टेलर!

दोन्ही संघांची Playing 11 (IND vs AUS 3rd ODI)

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा आणि जोश हेझलवूड.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment