IND vs AUS 2nd ODI Shubman Gill : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने यंदा आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्षातील 5 वे शतक झळकावले. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये शुबमनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चोपले आणि 97 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरचीही चांगली साथ लाभली ज्याने 90 चेंडूत 105 धावा केल्या. या शतकासोबतच शुबमनने अनेक मोठे विक्रमही आपल्या नावावर केले.
दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 5 बाद 399 धावा केल्या. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतके झळकावली. कर्णधार केएल राहुलने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक (52) झळकावले. कॅमेरून ग्रीनच्या षटकात सूर्यकुमार यादवने सलग 4 चेंडूत 4 षटकार ठोकले. सूर्यानेही अर्धशतक (72) झळकावले.
एका वर्षात 5 किंवा त्याहून अधिक शतके झळकावणारे भारतीय खेळाडू
- विराट कोहली (2012, 2017, 2018, 2019)
- रोहित शर्मा (2017, 2018, 2019)
- सचिन तेंडुलकर (1996, 1998)
- राहुल द्रविड (1999)
- सौरव गांगुली (2000)
- शिखर धवन (2013)
- शुबमन गिल (2023)
हेही वाचा – VIDEO : दोन महिने सोबत राहणाऱ्या मित्रालाच धुतलं, सूर्यकुमार यादवचे सलग 4 षटकार!
यंदा सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (ODI)
- 1230 शुबमन गिल (भारत) : 5 शतके, 6 अर्धशतके, सरासरी 76.12
- 934 आसिफ खान (यूएई) : 3 शतके, 4 अर्धशतके, सरासरी 44.47
- 819 पाथुम निसांका (श्रीलंका) : 2 शतके, 5 अर्धशतके, सरासरी 45.50
- 792 वी. अरविंद (यूएई) : 4 अर्धशतके , सरासरी 31.68
- 782 मोहम्मद वसीम (यूएई) : 1 शतक , 4 अर्धशतके, सरासरी 32.58
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोस इंग्लिश, अॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!