IND vs AUS 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईसच्या नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सच्या जागी कर्णधार म्हणून निवड झालेल्या स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय स्मिथच्या अंगाशी आला. भारताने ऑस्ट्रेलियासनमोर 400 धावांचे आव्हान ठेवले.
भारताकडून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या भारतीय फलंदाजांनी स्फोटक शतके झळकावून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. टीम इंडियाने 50 षटकात 5 विकेट गमावत 399 धावा केल्या. शुबमन गिलने 104 (6 चौकार आणि 4 षटकार), श्रेयस अय्यरने 105 (11 चौकार आणि 3 षटकार), आणि केएल राहुलने 52 (3 चौकार आणि 3 षटकार), धावा केल्या. सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावले. 72 धावा (6 चौकार आणि 6 षटकार), करून तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Car Tyre Pressure : कारच्या टायरमध्ये किती हवा असली पाहिजे? 30, 35 की 40?
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कप्तान स्टीव्ह स्मिथ शून्यावर बाद झाला. पाऊस पडल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 33 षटकात 317 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. डेव्हिड वॉर्नरने 7 चौकार आणि एक षटकारासह 53 धावा केल्या. रवीचंद्रन अश्विनने वॉर्नरसह मार्नस लाबुशेन आणि जोस इंग्लिस यांनाही बाद केले. अश्विननंतर रवींद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव 28.2 षटकात 217 संपुष्टात आला.
दोन्ही संघांची Playing 11
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोस इंग्लिश, अॅलेक्स कॅरी, कॅमेरुन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!