IND Vs AUS 1st T20 : भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये सिंगापूरच्या खेळाडूचं पदार्पण!

WhatsApp Group

IND Vs AUS 1st T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. टॉसनंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितले, की जसप्रीत बुमराह पहिला सामना खेळणार नाही. त्याचबरोबर ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिक यष्टीरक्षक म्हणून खेळत आहे. उमेश यादवला तीन वर्षांनंतर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

सिंगापूरच्या खेळाडूचं पदार्पण

कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार आरोन फिंचसह सलामी देईल. डेव्हिड वॉर्नर या मालिकेत खेळत नाही. त्याचवेळी सिंगापूरमध्ये जन्मलेला स्फोटक खेळाडू टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि नॅथन एलिससारखे वेगवान गोलंदाज आहेत. एलिस पंजाब किंग्जकडून खेळला आहे. केन रिचर्डसनच्या जागी त्याला संधी मिळाली आहे.

हेही वाचा – इज्जतीचा कचरा..! लखनऊमध्ये थांबलेल्या क्रिकेटरच्या रुममध्ये आढळला साप; शेअर केला PHOTO

टिम डेव्हिडला या संघात स्थान मिळालं आहे, ज्यानं मार्च २०२० पर्यंत सिंगापूर संघासाठी ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये देखील दिसला आणि त्यानं मुंबई इंडियन्ससाठी ९ सामने खेळले. मात्र, काही सामने वगळता अनेक सामन्यांमध्ये त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्यानं सर्वांना प्रभावित केलं. टिम डेव्हिडचे आई-वडील ऑस्ट्रेलियन आहेत, पण तो दोन वर्षांचा असताना त्याचं कुटुंब पर्थहून सिंगापूरला गेले. मिशेल स्वेप्सनच्या जागी टिम डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या टी-२० वर्ल्डकप संघातही निवडला गेला आहे.

हेही वाचा – धोनी, कोहलीची पूजा करणं बंद करा..! गौतम गंभीरचं वक्तव्य ठरणार वादग्रस्त?

दोन्ही संघांची Playing 11

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment