IND Vs AUS 1st T20 : मोहालीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतासाठी सलामी दिली. आक्रमक खेळण्याच्या नादात भारताने कप्तान रोहित शर्मा (११) आणि विराट कोहली (२) यांना स्वस्तात गमावले. रोहितला जोश हेझलवूडने तर विराटला नॅथन एलिसने बाद केले. सुरुवातीच्या पडझडीनंतर केएल राहुलने संघाचा मोर्चा सांभाळला.
राहुलचा ‘लय भारी’ SIX!
राहुलने कोणताही दबाव न घेता फटकेबाजी केली. यादकरम्यान राहुलने असे फटके खेळले, जे पाहून सगळे मंत्रमुग्ध झाले. यातील एक फटका त्याने जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर खेळला. त्याने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हेझलवूडला षटकार ठोकला. पिकअप फटका खेळताना राहुलने गगनचुंबी षटकार ठोकला. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. १२व्या षटकात राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात राहुलने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. केएल राहुलने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत.
हेही वाचा – IND Vs AUS 1st T20 : भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमध्ये सिंगापूरच्या खेळाडूचं पदार्पण!
Whip(K)lash Rahul! 👌 👌
How about that for a SIX! 👏 👏
Follow the match 👉 https://t.co/ZYG17eC71l #TeamIndia | @klrahul
Don’t miss the LIVE coverage of the #INDvAUS match on @StarSportsIndia pic.twitter.com/UwwUDArHiP
— BCCI (@BCCI) September 20, 2022
दोन्ही संघांची Playing 11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिश, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.