भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात (IND vs AFG 3rd T20) टीम इंडियाच्या दोन फलंदाजांनी अफगाण गोलंदाजांची पिसे काढली. 22 धावांवर 4 विकेट अशी अवस्था असताना कप्तान रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी 190 धावांची जबरदस्त आणि नाबाद पार्टनरशिप रचली. या दोघांनी अफगाण गोलंदाज करीम जनतने टाकलेल्या 20व्या षटकात 5 षटकारांसह 36 धावांची लयलूट (Rohit Sharma Rinku Singh 36 runs in 20th Over) केली. यात रोहितने एक चौकार आणि 2 षटकार तर रिंकूने लागोपाठ 3 षटकार ठोकले. रोहितने 11 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 121 तर रिंकूने 2 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली. भारताने अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 212 धावा केल्या. जानेवारी 2019 नंतप रोहित शर्माचे सर्व टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक ठरले.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
- 5 रोहित शर्मा
- 4 सूर्यकुमार यादव
- 4 ग्लेन मॅक्सवेल
हेही वाचा – रोहित शर्माचा कदाचित पहिलाच ‘स्विच हिट’ षटकार! पाहा VIDEO
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च पार्टनरशिप
- 190* रोहित शर्मा – रिंकू सिंह विरुद्ध अफगाणिस्तान बंगळुरू 2024
- 176 संजू सॅमसन – दीपक हुडा विरुद्ध आयर्लंड डब्लिन 2022
- 165 रोहित शर्मा – केएल राहुल विरुद्ध श्रीलंका इंदूर 2017
- 165 यशस्वी जयस्वाल – शुबमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज लॉडरहिल 2023
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.
अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान (कर्णधार), गुलाबदिन नैब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झाद्रान, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!