भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 1st T20) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 15 चेंडू शिल्लक असताना 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने निर्धारित 20 षटकांत 5 विकेट गमावून भारतासमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ज्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीवीर म्हणून आले. कर्णधार रोहित शर्माला पहिल्याच षटकात खाते न उघडताच माघारी (Rohit Sharma Run Out) जावे लागले. तर गिल 23 धावा करून स्वस्तात बाद झाला.
हेही वाचा – जगातील असा देश, जिथं गुन्हेगारांना पूजलं जातं, त्यांचे फोटो मंदिरात ठेवले जातात!
मधल्या फळीत फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माला मोठी खेळी खेळता आली नाही. तिलकला 22 चेंडूत केवळ 26 धावा करता आल्या. त्यानंतर जितेश शर्मा (31) आणि शिवम दुबे (60) यांनी भारताचा डाव पुढे नेला. दोन्ही खेळाडूंनी खडतर शॉट्स खेळून भारताला लक्ष्याच्या जवळ नेले. जितेश बाद झाल्यानंतर अखेर रिंकू सिंहने (16) उर्वरित काम पूर्ण केले.
रोहित पुन्हा रनआऊट
भारताच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर शॉट खेळताच रोहित शर्माने धाव घेतली, पण शुबमन त्याच्याकडे पाहण्याऐवजी चेंडूकडे पाहत राहिला. रोहित जवळपास नॉन स्ट्राइक एंडला पोहोचला, पण शुबमन क्रीजवरून हलला नाही. यानंतर रोहित खूप रागाने डगआऊटकडे परतला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित धावबाद होण्याची ही सहावी वेळ होती. सामना संपल्यानंतर रोहित म्हणाला, ”प्रामाणिकपणे, हे रन-आऊट होत राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघ जिंकला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि गिलने चांगली खेळी खेळली”. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील 100 विजयांचा भाग होणार रोहित शर्मा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!