नीरज चोप्राला मिळू शकतात 41.60 लाख..! ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मारलं तर होईल मालामाल

WhatsApp Group

Paris Olympics 2024 : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कोणत्याही स्पर्धेत सुवर्णासह इतर पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यावेळी भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण जिंकले तर त्याला खूप फायदा होईल.

पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे. प्रथमच, जागतिक ऍथलेटिक्स (WA) ने बुधवारी या ऑलिम्पिकमधील 48 ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमधील सुवर्णपदक विजेत्यांना $50,000 (रु. 41.60 लाख) ची बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली.

जागतिक ऍथलेटिक्सच्या या हालचालीमुळे 2028 मध्ये लॉस एंजेलिस (LA) येथे होणाऱ्या खेळांमधील तीनही पदक विजेत्यांना पुरस्कार देण्याचा मार्ग मोकळा होईल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने ॲथलेटिक्समध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

यासह तो नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा देशाचा दुसरा खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे, WA ऑलिंपिक खेळांमध्ये बक्षीस रक्कम देणारा पहिला आंतरराष्ट्रीय महासंघ बनेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment