ICC World Cup 2023 Qualifiers : वर्ल्डकप 2023 भारतात होणार आहे ज्यासाठी भारतासह आठ संघ आधीच मुख्य फेरीत पोहोचले आहेत. आणि उर्वरित दोन ठिकाणांसाठी क्वालिफायर फेरी खेळवली जात आहे. झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या या फेरीत दहा संघ सहभागी झाले होते, त्यापैकी चार संघ बाद झाले आहेत. तर श्रीलंकेसह सहा संघांनी सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले आहे. रविवारी आयर्लंडविरुद्ध 133 धावांनी शानदार विजय नोंदवून 1996 चा विश्वविजेता संघ आता सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे. ही फेरी 29 जूनपासून सुरू होणार असून या क्वालिफायर स्पर्धेचा अंतिम सामना 9 जुलै रोजी होणार आहे.
या सामन्यात प्रथम खेळताना श्रीलंकेचा संघ 49.5 षटकात 325 धावा करत सर्वबाद झाला. सलामीवीर दिमुथ करुणारत्नेने 103 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय समरविक्रमानेही 82 धावा केल्या. यानंतर गोलंदाजी करताना वानिंदू हसरंगाने 5 बळी घेतले. संपूर्ण आयर्लंड संघ केवळ 31 षटके खेळला आणि 192 धावांवर आटोपला. वानिंदू हसरंगाने 10 षटकांत 79 धावांत 5 बळी घेतले. महिष थिक्षणाला दोन बळी मिळाले. याशिवाय कसून रजिता, लाहिरू कुमारा आणि दासून शनाका यांनी 1-1 बळी घेतला.
Ireland has officially been knocked out of the ICC Cricket World Cup Qualifiers 2023💔#CricTracker #WorldCup2023 pic.twitter.com/zedmCqpBYp
— CricTracker (@Cricketracker) June 25, 2023
हे संघ पात्र ठरले
क्वालिफायर फेरीच्या लीग टप्प्यातील अडथळा पार करून 6 संघ सुपर सिक्ससाठी पात्र ठरले आहेत. झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज यांनी अ गटातून, तर ब गटातून श्रीलंका, स्कॉटलंड आणि ओमानने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. नेपाळ, अमेरिका, आयर्लंड आणि यूएई या चार संघांचा प्रवास आता संपला आहे. म्हणजेच 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचे या संघांचे स्वप्न आता भंगले आहे.
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात अचानक घसरण, बाजारात लोकांची रांग!
भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता. 2015 आणि 2019 मध्ये भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता परंतु अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर संघाचे विजेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. पण यावेळी एकदिवसीय वर्ल्डकप भारतीय भूमीवर होत असल्याने टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जाऊ शकतो. टीम इंडियाने शेवटच्या वेळी 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता जेव्हा भारत संयुक्त यजमान होता आणि यावेळी तो एकमेव यजमान आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!