ICC ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतीय भूमीवर खेळवला जाणार आहे. आता विश्वचषकाबाबत आयसीसीकडून लवकरच वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे पाठवला असून त्यावर सर्व देशांकडून अभिप्राय घेण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तान सामना
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, गतविजेता इंग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला विश्वचषकाची सुरुवात होईल. त्याच वेळी, भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
हेही वाचा – UPSC Prelims Result 2023 : यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर! ‘या’ लिंकवरून करा चेक
इतर मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड 29 ऑक्टोबरला धरमशाला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड 4 नोव्हेंबरला अहमदाबाद आणि 1 नोव्हेंबरला पुण्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने होतील. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये 9 शहरांमध्ये खेळणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी संघाचे गट टप्प्यातील सामने पाच ठिकाणी होणार आहेत.
India's venue in World Cup 2023! 🏏
– IND vs PAK is to be played at Ahmedabad.
#WorldCup#INDvsPAK #Cricket pic.twitter.com/xUbOaEfJy0
— OneCricket (@OneCricketApp) June 12, 2023
भारतीय संघाचे पूर्ण वेळापत्रक
- 8 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, चेन्नई
- 11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
- 15 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
- 19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
- 22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
- 29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
- 2 नोव्हेंबर विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
- 5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
- 11 नोव्हेंबर विरुद्ध क्वालिफायर, बंगळुरू
यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघांमध्ये 48 सामने होणार आहेत. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या मेगा स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ या महिन्यात झिम्बाब्वे येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केले जातील. पात्रता स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, नेदरलँड, आयर्लंड, नेपाळ, ओमान, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.
अंतिम सामना
2019 एकदिवसीय विश्वचषकाप्रमाणे, यावेळी देखील सामने राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळले जातील, जिथे प्रत्येक संघ दुसर्याविरुद्ध एकदा खेळेल. म्हणजेच ग्रुप स्टेज संपल्यानंतर सर्व संघ 9-9 सामने खेळले असतील. गटातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबरला खेळवले जाण्याची शक्यता आहे. आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे, जो स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्याचे आयोजन करेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!