ICC ODI World Cup 2023 Schedule : आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकप 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. आज (27 जून) आगामी वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनऊ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाला या 12 शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. पहिला उपांत्य सामना मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना कोलकाता येथे खेळवला जाईल. अंतिम सामना अहमदाबाद येथे होणार आहे.
या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. आठ संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे तर झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर दोन संघ निश्चित केले जातील. वर्ल्डकपचे वेळापत्रक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलनंतर घोषित केले जाणार होते, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) मुळे त्याला विलंब झाला. पीसीबीने पाकिस्तान संघाच्या सामन्यांसाठी काही जागा बदलण्याची मागणी केली होती, त्यामुळे अनेक दिवस गोंधळ सुरू होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पीसीबीची जागा बदलण्याची मागणी मान्य केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे.
Team India's fixtures at the 2023 World Cup. pic.twitter.com/6SgesUZDrb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 27, 2023
हेही वाचा – EPFO कडून दिलासा! अधिक पेन्शनसाठी मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत संधी!
ICC 2023 World Cup schedule. pic.twitter.com/0ppfXxQgt1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 27, 2023
भारत वर्ल्डकप 2023 चे वेळापत्रक
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश – 19 ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ
- भारत विरुद्ध संघ – 2 नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 5 नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध पात्र संघ – 11 नोव्हेंबर, बंगळुरू
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!