World Cup 2023 : भारताचे दोन सराव सामने FREE मध्ये कुठे पाहता येतील?

WhatsApp Group

World Cup 2023 Warm Up Matches : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी जगातील 10 सर्वोत्तम क्रिकेट संघ उत्सुक आहेत. अनेक संघ भारतात आले आहेत तर पाकिस्तानचा संघही लवकरच भारतात येणार आहे. विश्वचषकापूर्वी सर्व 10 संघांना सराव सामन्यांमध्ये त्यांच्या तयारीची चाचणी घेण्याची संधी मिळेल. सर्व संघ 2-2 सराव सामने खेळतील. त्यानंतर विश्वचषकातील मुख्य सामने खेळवले जातील. 29 सप्टेंबरपासून सराव सामने सुरू होतील. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ते सराव सामन्यांचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात.

विश्वचषकाचे सराव सामने शुक्रवारपासून (29 सप्टेंबर) खेळवले जाणार आहेत. हे सामने भारतातील 3 ठिकाणी (गुवाहाटी, तिरुवनंतपुरम, हैदराबाद) खेळले जातील. पहिल्या सराव सामन्यात भारत गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. हा सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. दुसरा सराव सामना नेदरलँड्सशी होईल. सर्व सराव सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तुम्ही Disney Hot Star वर विश्वचषक 2023 सराव सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग विनामूल्य पाहू शकता.

हेही वाचा – Anand Mahindra FIR News : आनंद महिंद्रा यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment