World Cup 2023 10 Teams List : आयसीसी विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. स्पर्धेतील सर्व 10 संघांची नावे समोर आली आहेत. स्कॉटलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवत नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीतील आपले स्थान निश्चित केले. क्वालिफायर सामन्यांमध्ये लज्जास्पद कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला पहिल्यांदाच विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. झिम्बाब्वेच्या संघाने विश्वचषकाचे तिकीट मिळवण्याची शेवटची संधीही गमावली.
यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व 10 संघांची नावे समोर आली आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या आधारे या स्पर्धेत खेळणाऱ्या पहिल्या 8 संघांची नावे निश्चित करण्यात आली. अव्वल 8 एकदिवसीय क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला. उर्वरित 2 संघांची नावे विश्वचषक पात्रता सामन्यांमधून निश्चित करण्यात आली.
NETHERLANDS QUALIFIED FOR WORLD CUP 2023.
Dutch chased down 278 runs from just 43 overs & created history. pic.twitter.com/vYH5GtE2xJ
— Johns. (@CricCrazyJohns) July 6, 2023
आयसीसी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणाऱ्या भारताने विश्वचषक सुपर लीगमध्ये सहावे स्थान पटकावले. यजमान असल्याने स्पर्धेत संघाचे स्थान आधीच पक्के झाले होते. भारत एकट्याने विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1987, 1996 आणि 2011 मध्ये शेजारी देशांसोबत संयुक्तपणे यजमानपद भूषवल्यानंतर बीसीसीआयसाठी ही मोठी उपलब्धी असेल.
हेही वाचा– MS Dhoni Net Worth : एका वर्षात ‘इतके’ कोटी कमावतो महेंद्रसिंह धोनी!
सुपर लीगमध्ये चमकदार कामगिरी करून स्पर्धेत स्थान मिळवणाऱ्या आयसीसी विश्वचषकात स्थान मिळवणाऱ्या टॉप 8 संघांमध्ये न्यूझीलंड पहिल्या स्थानावर आहे. सध्याचा विश्वचषक विजेता इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. बांगलादेशचा संघ तिसऱ्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावर राहिला. अफगाणिस्तानचा संघ पाचव्या तर भारत सहाव्या क्रमांकावर होता. पाकिस्तान सातव्या क्रमांकावर तर दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटच्या स्थानावर होता.
The 𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝟏𝟎 for the 2023 ODI World Cup are here 🤩 pic.twitter.com/n7TMg93SqD
— Sport360° (@Sport360) July 6, 2023
13 पैकी शेवटच्या 5 संघांना जे विश्वचषक सुपर लीगमध्ये स्थान मिळवू शकले नाहीत त्यांना सहयोगी देशांसोबत खेळून स्पर्धेत स्थान मिळवण्याची दुसरी संधी देण्यात आली. 5 सहयोगी संघ आणि 5 प्रमुख संघांनी विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेने प्रथम क्वालिफायरद्वारे विश्वचषकासाठी जागा निश्चित केली, त्यानंतर नेदरलँड्सने स्कॉटलंडविरुद्ध विजय नोंदवून विश्वचषकाचे तिकीट मिळवले. नेदरलँड्स संघाला 11 नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. या संघाबाबत टीम इंडियाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
सर्वात मोठी निराशा 2 वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजकडून झाली. विश्वचषक पात्रता फेरी खेळण्यासाठी आलेल्या संघाला स्कॉटलंडविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!