चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : ICC कडून ‘हायब्रिड मॉडेल’वर शिक्कामोर्तब, भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही!

WhatsApp Group

Champions Trophy Update : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ‘हायब्रिड मॉडेल’वर आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे होणार आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्यात एक करारही झाला आहे. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने दुबईत खेळणार आहे. तर उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे.

BCCI आणि PCB या दोघांनी 2026 च्या टी-20 विश्वचषकातील साखळी सामन्यांसाठी पाकिस्तान भारतात जाणार नाही, यावर तत्वतः सहमती दर्शवली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोमध्ये खेळणार आहे. हायब्रीड मॉडेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केल्यामुळे पीसीबीला कोणतीही भरपाई मिळणार नाही. पण 2027 नंतर आयसीसी महिलांच्या कोणत्याही स्पर्धेचे यजमानपद भूषवायला मिळेल.

हेही वाचा – Mutual Fund : आता फक्त 2 दिवसात बंद होणार SIP, कोणताही दंड लागणार नाही!

या स्पर्धेसाठी भारत सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी दिली नाही. अशा परिस्थितीत ‘हायब्रीड मॉडेल’ हा एकमेव पर्याय होता. बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली होती. आयसीसीच्या बैठकीत पीसीबीने ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक नसल्याचा जोर दिला असला तरी, त्याची भूमिका मवाळ झाली.

1996 नंतर पाकिस्तानचा पहिला आयसीसी इवेंट

1996 नंतर पाकिस्तानचा हा पहिला आयसीसी इवेंट आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी 2012 पासून द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, परंतु गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकासह आयसीसी स्पर्धांमध्ये ते एकमेकांसमोर आले आहेत. गेल्या वर्षी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानने आयोजित केलेला आशिया कप देखील ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये बदलण्यात आला होता. त्यानंतर भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नंतर आयसीसी कॅलेंडरमध्ये परत येत आहे. पाकिस्तानने 2017 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची शेवटची स्पर्धा जिंकली होती. 2008 पासून भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. 2008 मध्ये आशिया कपसाठी भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानला गेला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका शेवटची 2012-13 मध्ये झाली होती. यानंतर दोन्ही संघ फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्येच आमनेसामने आले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment