अफगाणिस्तानच्या बॅटरचा पाकिस्तानात धुमाकूळ, फक्त 5 दिवसात मोडला विश्वविक्रम!

WhatsApp Group

Ibrahim Zadran : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सध्या पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवली जात आहे. अफगाणिस्तान संघाचा स्टार खेळाडू इब्राहिम झाद्रानने स्पर्धेत खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ऐतिहासिक खेळी खेळली आणि विश्वविक्रम केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुधवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने ७ विकेटच्या मोबदल्यात ३२५ धावा केल्या.

अफगाण संघासाठी इब्राहिम झाद्रानने ऐतिहासिक खेळी केली आणि जलद शैलीत शतक झळकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा तो पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला आहे. या सामन्यात झाद्रानने १४६ चेंडूत १७७ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ६ षटकार आणि १२ चौकार मारले.

हेही वाचा – महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : परळी, बारामती येथील पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयांना मंजूरी

या खेळीच्या जोरावर, झाद्रानने ५ दिवसांत एक ऐतिहासिक विश्वविक्रम मोडला आहे. इंग्लंडच्या बेन डकेटने २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६५ धावांची खेळी खेळली. त्यानंतर डकेट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज बनला.

पण आता हा विक्रम झाद्रानने मोडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात एकाच सामन्यात सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणारा झाद्रान फलंदाज बनला आहे. या दोघांपूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नाथन अ‍ॅस्टलच्या नावावर होता, ज्याने २००४ च्या हंगामात ओव्हल मैदानावर अमेरिकेविरुद्ध १४५ धावा केल्या होत्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळाडूने केलेला सर्वोत्तम स्कोअर

१७७: इब्राहिम झाद्रान (अफगाणिस्तान) विरुद्ध इंग्लंड, लाहोर २०२५

१६५: बेन डकेट (इंग्लंड) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर २०२५

नाबाद १४५ : नॅथन अ‍ॅस्टल (न्यूझीलंड) विरुद्ध अमेरिका, द ओव्हल २००४

१४५: अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे) विरुद्ध भारत, कोलंबो २००२

१४१: सौरव गांगुली (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नैरोबी २०००

१४१ धावा: सचिन तेंडुलकर (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ढाका १९९८

१४१: ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, सेंच्युरियन २००९

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment