जसा सचिनचा, तसा इंडियाच्या गोलकीपरचा सन्मान, व्वा क्या बात!

WhatsApp Group

Paris 2024 Olympics PR Sreejesh : बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय घेत हॉकी इंडियाने अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला सलग दुसरे कांस्यपदक जिंकून देण्यात श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीजेशची जर्सी निवृत्त करून हॉकी इंडियाने महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची आठवण करून दिली. बीसीसीआयने सचिनची 10 नंबरची जर्सीही निवृत्त केली होती.

हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग म्हणाले, “श्रीजेशने जवळपास दोन दशके भारतीय हॉकी संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी परिधान करून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने भारतीय हॉकीसाठी जे काही केले त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. त्यामुळे 16 क्रमांकाची जर्सी आता निवृत्त करावी, असा निर्णय आम्ही घेतला आहे. श्रीजेश आता ज्युनियर राष्ट्रीय हॉकी संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. आम्हाला आशा आहे की तो आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने युवा खेळाडूंना तयार करेल.”

हेही वाचा – मनातील गोष्ट बोलल्या अर्थमंत्री! निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला वाटतं टॅक्स झिरो व्हायला हवा…”

श्रीजेशच्या सन्मानार्थ आयोजित एका विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी श्रीजेश म्हणाला, “हॉकी इंडियाने माझी जर्सी क्रमांक 16 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भारतीय हॉकी संघाचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.”

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment