आधी देश, मग बाकीचं; शेवटच्या क्षणी निर्णय फिरवला; हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची आयपीएल बंदी

WhatsApp Group

Harry Brook : पुढील काळातील फॅब फोर यादीत सामील होऊ पाहणाऱ्या हॅरी ब्रुकवर दिल्ली कॅपिटल्सचे चाहते रागावले आहेत. खेळायला पाहिजे होतं, आयपीएल खेळायला मिळतंय तर खेळायचं नाही, अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. पण हॅरी ब्रूक आयपीएल २०२५ खेळणार नाही, त्यामुळे शेवटच्या क्षणी माघार घेतल्यानंतर इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकवर दोन हंगामांसाठी बंदी घालण्यात आली आहे. आता तो २०२५ आणि २०२६ च्या आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला, ब्रूकने सलग दुसऱ्या हंगामासाठी आयपीएलमधून स्वतःला अनुपलब्ध घोषित केले आणि दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागितली.

एजन्सीनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एक नियम आणण्यात आला होता आणि तो लागू करण्यात आला आहे. ही बंदी २०२५ आणि २०२६ च्या हंगामापर्यंत कायम राहील.

बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, लिलावात निवड झाल्यानंतर (दुखापग्रस्तशिवाय) स्पर्धेतून माघार घेणाऱ्या कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमधून दोन हंगामांसाठी बंदी घातली जाते.

गेल्या वर्षी फ्रेंचायझींसोबत शेअर केलेल्या बीसीसीआयच्या कागदपत्रांनुसार, जो कोणताही परदेशी खेळाडू लिलावासाठी स्वतःची नोंदणी करतो आणि निवड झाल्यानंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्वतःला अनुपलब्ध घोषित करतो त्याला आयपीएल आणि आयपीएल लिलावातून दोन हंगामांसाठी बंदी घातली जाईल.

हेही वाचा – अफगाणिस्तानी क्रिकेटरच्या 2 वर्षीय मुलीचे निधन, सहकाऱ्याने दिली बातमी

आयपीएलमधून माघार घेण्याचे कारण  

इंग्लंडमधील कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रूकने आयपीएल २०२५ मधून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी, २०२४ मध्ये, त्याने त्याच्या आजीच्या निधनामुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने या आठवड्यात सोशल मीडियावर लिहिले की, मी आगामी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची बिनशर्त माफी मागतो. इंग्लंड क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा काळ आहे.

त्याने पुढे लिहिले, मला येणाऱ्या मालिकेच्या तयारीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे. मला माहीत आहे की सर्वांना हे समजणार नाही. मला तशी आशाही नाही, पण मला जे योग्य वाटेल तेच करावे लागेल. माझ्यासाठी, माझ्या देशासाठी खेळणे हे नेहमीच माझे प्राधान्य आणि लक्ष केंद्र असेल.

इंग्लंडचे आगामी वेळापत्रक

इंग्लंड जूनमध्ये भारताविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळेल आणि त्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान बहुप्रतिक्षित अ‍ॅशेस मालिका खेळेल. ब्रूकच्या या निर्णयानंतर त्याच्या आयपीएल कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. आता तो २०२७ मध्ये परत येऊ शकतो की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment