हरमनप्रीत कौर आणि पंचांमध्ये खडाजंगी! चूक कुणाची? काय आहे ‘डेड बॉल’ नियम? वाचा

WhatsApp Group

Harmanpreet Kaur Dead Ball Controversy : आयसीसी टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंचांचा निर्णय आणि भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रनआऊटमुळे हा सामना वादात सापडला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हरमनप्रीतची पंचांशी बाचाबाची झाली. पहिल्या डावात न्यूझीलंडची अमेलिया केर रनआऊट झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. डेड बॉल दिल्यानंतर अंपायरने हा रनआऊट विचारात घेतला नाही.

न्यूझीलंडच्या डावातील 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर असे काही घडले ज्यामुळे वाद निर्माण झाला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अमेलियाने दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर लाँग ऑफच्या दिशेने चेंडू तटवला आणि एक धाव घेतली. हरमनप्रीतने सीमारेषेजवळ आरामात चेंडू पकडला आणि ती हळू हळू पुढे सरकत होती. त्यानंतर न्यूझीलंडचा फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावत असल्याचे तिने पाहिले आणि चेंडू थेट यष्टीरक्षक रिचा घोषच्या दिशेने फेकला. कोणतीही चूक न करता तिने चेंडू घेतला आणि रनआऊट केले. न्यूझीलंडची फलंदाज डगआऊटच्या दिशेने जात असताना तिसऱ्या पंचाने तिला थांबवले.

प्रत्यक्षात ओव्हर संपली आणि चेंडू हरमनप्रीतने घेतला तेव्हा तो ‘डेड बॉल’ घोषित करण्यात आला. हा सर्व प्रकार घडला तेव्हा षटक संपल्यानंतर दीप्तीने अंपायरच्या हातातून तिची कॅप काढून घेतली होती. पण हरमनप्रीतच्या थ्रोनंतर रिचाने रनआऊट केले. अंपायरने आधीच ‘डेड बॉल’ घोषित केला होता, त्यामुळे न्यूझीलंडची दुसरी धाव वैध नव्हती आणि रनआउटचा निर्णयही दिला गेला नाही.

हेही वाचा – बापरे बाप! 36 मीटर जमिनीची किंमत 2232 कोटी रुपये, जगातील सर्वात महागडी बोली

नियम काय सांगतो?

भारत-न्यूझीलंड सामन्यात पंचांनी ‘डेड बॉल’ घोषित केला तेव्हा फलंदाजांनी धाव घेतली पाहिजे नव्हती. डेड बॉलशी संबंधित कायदा 20 नुसार, कलम 20.1 मध्ये असे म्हटले आहे, “डेड बॉल तेव्हाच होईल जेव्हा गोलंदाजांकडून पंचांना असे दिसून येईल की क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आणि खेळपट्टीवरील फलंदाज या दोघांनीही खेळ सोडलेला असेल. म्हणजे क्षेत्ररक्षक थ्रो करणार नाहीत आणि फलंदाज धाव घेणार नाहीत, जर घेतली तर ती मान्य असणार नाही.”

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment