ICC चा ‘हा’ अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय हरमनप्रीत कौर!

WhatsApp Group

Harmanpreet Kaur ICC Women’s Player of the Month : आयसीसीने सप्टेंबर महिन्यासाठी सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला आहे. महिला आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारातही भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला महिलांमध्ये हा सन्मान देण्यात आला आहे. आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर महिन्यासाठी पुरुषांमध्ये महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे.

हरमनप्रीतची या खेळाडूंसोबत होती स्पर्धा

महिलांमध्ये हरमनप्रीतचा सामना भारताच्या स्मृती मंधाना आणि बांगलादेशच्या निगार सुलतानाशी होता. निवडलेल्या तीनही खेळाडूंनी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भारताच्या हरमनप्रीत आणि मंधाना यांनी गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावली असली तरी वनडे मालिकेत इंग्लंडचा सफाया केला.

हेही वाचा – “हे मूर्ख हिंदूंची चेष्टा करतात”, विवेक अग्निहोत्री आमिर खानच्या ‘त्या’ जाहिरातीवर भडकले!

गेल्या महिन्यात हरमनप्रीतची शानदार कामगिरी

हरमनप्रीतने इंग्लंडविरुद्धच्या निराशाजनक टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने २२१ धावा केल्या आणि ती सर्वाधिक धावा करणारी ठरली. हरमनने पहिल्या सामन्यात नाबाद ७४ आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद १४३ धावा केल्या. यामुळे भारताने १९९९ नंतर इंग्लंडमध्ये पहिली वनडे मालिका जिंकली.

त्याचवेळी रिझवानची स्पर्धा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्याशी होती. या तिघांनीही गेल्या महिन्यात वेगवेगळ्या मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचवेळी रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत आशिया चषक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेलने आपली पात्रता सिद्ध केली होती. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत शानदार फलंदाजी केली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment