“…यावर माझा विश्वास बसत नाहीये”, वर्ल्डकपबाहेर गेलेल्या हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया!

WhatsApp Group

Hardik Pandya World Cup 2023 in Marathi : विश्वचषकादरम्यान टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो एनसीएमध्ये रिहॅबमध्ये होता. आता तो विश्वचषकातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही, अशी माहिती आयसीसीने दिली. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिकने प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर भारताला चिअर करणार असल्याचे म्हटले आहे.

हार्दिक पांड्याने म्हटले, ”मी विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही यावर माझा विश्वास बसत नाहीये. मी पूर्ण भावनेने संघासोबत असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर टीम इंडियाचा जयजयकार करेन. सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद, हे अविश्वसनीय आहे. हा संघ खास आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी शकतो.”

हेही वाचा – रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना गूड न्यूज, भाडे सवलतीबाबत मोठे अपडेट!

प्रसिध कृष्णाला संधी

हार्दिक पांड्याला वगळल्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला वर्ल्डकप 2023 साठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. कृष्णाने 23 मार्च 2021 रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले. या सामन्यात त्याने 8.1 षटकात 54 धावा देत 3 बळी घेतले. टीम इंडियाने हा सामना 66 धावांनी जिंकला होता. प्रसिध कृष्णाने आतापर्यंत 17 वनडे खेळले असून 26च्या सरासरीने 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment