मोठी बातमी..! रोहित हकालपट्टीच्या उंबरठ्यावर? ‘हा’ खेळाडू होणार भारताचा पुढचा कॅप्टन!

WhatsApp Group

T20 And ODI Captaincy : टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला धक्का लागणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत टीम इंडियाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर सूत्रांनी बुधवारी रात्री ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आता फक्त टेस्ट फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

हार्दिककडे जबाबदारी?

स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आता कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच अधिकृतपणे त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवू शकते. हार्दिककडे पांढऱ्या चेंडूच्या फॉर्मेटमध्ये म्हणजे एकदिवसीय आणि टी-२० मध्ये कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. अशा परिस्थितीत रोहित शर्मा केवळ कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली, यावर्षी ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंड टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनली.

हेही वाचा – Pan Card : पॅन कार्डधारकांनो सावधान..! ‘हे’ नाही केलं तर बसेल १० हजार रुपयांचा फटका

हार्दिकने मागितली वेळ

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले, ”आमच्याकडे ही योजना आहे. याबाबत आम्ही हार्दिकशी चर्चा केली आहे. त्याने काही दिवसांची वेळ मागितली आहे. हार्दिक लवकरच उत्तर देईल. या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु आम्ही सध्या त्याला पांढऱ्या चेंडूचे कर्णधारपद देण्याच्या प्रक्रियेत आहोत. बघूया पुढे काय होते.”

हार्दिक पंड्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये गुजरात टायटन्सला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले. विशेष बाब म्हणजे गुजरातच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये प्रवेश केला आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. हार्दिकने आयपीएल-२०२२ मध्ये १५ सामन्यांमध्ये ४४.२७ च्या सरासरीने ४८७ धावा केल्या आणि चार अर्धशतकेही झळकावली. या मोसमात त्याने ८ विकेट्सही घेतल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment