World Cup 2023 : टीम इंडियाला अजून एक धक्का, हार्दिक पांड्याला दुखापत!

WhatsApp Group

Hardik Pandya Injured News In Marathi : भारतीय क्रिकेट संघ रविवारी आपल्या घरच्या मैदानावर आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात करत आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा सामना 5 वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाशी (World Cup 2023 IND vs AUS) होणार आहे. या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वीच भारताला पराभवाचा धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिलला डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली असतानाच अष्टपैलू हार्दिक पांड्या सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर आली आहे.

हार्दिक पांड्याला दुखापत (Hardik Pandya Injured)

RevSportz नुसार, भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव करताना जखमी झाला. फलंदाजीचा सराव करत असलेल्या हार्दिकच्या बोटावर वेगवान चेंडू लागला आणि त्यानंतर त्याने पुढे फलंदाजी केली नाही. मात्र, दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सराव न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – वर्ल्डकपच्या मॅचपूर्वी शुबमन गिलला डेंग्यूची लागण! ‘या’ खेळाडूला संधी?

शुबमन गिलला डेंग्यू

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शुबमन गिल डेंग्यूने त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता फारशी नाही. मात्र, संघ व्यवस्थापनाने अद्याप आशा सोडलेली नाही. शुक्रवारी दुसऱ्या फेरीच्या चाचण्यांनंतर गिलच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाईल. भारतीय संघ रविवारी विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment