

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. आता या दोन्ही खेळाडूंबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे, की रोहित आणि हार्दिकने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. काही चाहत्यांचा असा विश्वास आहे की या दोघांनी कधीही एकमेकांना फॉलो केले नाही. इतकेच नाही तर अनेक चाहत्यांच्या मते हार्दिक पांड्याने रोहित शर्माला अनफॉलो केले आहे. वैभव भोला, जे स्वतःला क्रीडा एडिटर म्हणवतात. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या मिनी ऑक्शनपूर्वी, 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली. रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्यापासून बरेच वाद निर्माण झाले आहेत. फ्रँचायझीच्या निर्णयामुळे चाहते संतप्त झाले आणि त्यांनी असे का केले, हे जाणून घ्यायचे होते. काही महिन्यांनंतर, मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने यावर प्रतिक्रिया दिली आणि रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिकला नवा कर्णधार का करण्यात आला हे स्पष्ट केले.
हेही वाचा – दोस्त असावा तर धोनीसारखा..! बॅटवर ‘प्राइम स्पोर्ट्स’ दुकानाचं नाव, आठवलं का?
स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना मार्क बाऊचर म्हणाला, “मला वाटते हा क्रिकेटचा निर्णय होता. हार्दिकला एक खेळाडू म्हणून संघात परत आणण्यासाठी आम्हाला एक विंडो मिळाली. मुंबईसाठी हा बदलाचा काळ आहे. बहुतेक भारतीय चाहत्यांना हे समजत नाही आणि ते खूप भावूक होतात, पण भावनांना या सगळ्यापासून दूर ठेवावे लागते. हा फक्त क्रिकेटचा निर्णय होता. यामुळे रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी समोर येईल. तो क्रीजवर जाऊन त्याच्या फलंदाजीचा आनंद घेईल आणि धावा काढेल.”
मार्क बाउचरनेही हार्दिक पांड्याच्या कर्णधार कौशल्याचे कौतुक केले. तो म्हणाला, “तो मुंबई इंडियन्सचा आहे. तो दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये गेला, जिथे त्याने पहिल्या वर्षी विजेतेपद जिंकले आणि दुसऱ्या वर्षी उपविजेतेपद मिळविले. यावरून त्याच्याकडे अप्रतिम कर्णधार कौशल्य असल्याचे दिसून येते.”
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!