IPL 2023 : विराट कोहलीसोबतच्या भांडणानंतर गौतम गंभीरचं ट्वीट; म्हणाला, “हे पळपुटे..”

WhatsApp Group

IPL 2023 Gautam Gambhir Slams Rajat Sharma : गौतम गंभीर आणि विराट कोहली (Gambhir Vs Kohli) यांच्यातील मैदानावरील वाद अजूनही चर्चेचा विषय आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यानंतर टीम इंडियाच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मात्र गौतम गंभीरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण गंभीरने या प्रकरणावर मत दिले. पण त्याचा सूर तिसऱ्या व्यक्तीबाबत होता.

जेव्हा दोन लोकांमध्ये भांडण होते तेव्हा दोघेही एकमेकांवर कमेंट करतात. गंभीर आणि कोहलीने त्यांच्या युक्तिवादावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. या भांडणावर माजी क्रिकेटपटूंनीही आपले मत मांडले आहे. कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती पण गंभीरने काही मत दिले नव्हते. आता गंभीरने आता ट्विटरवर तिसऱ्या व्यक्तीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ती व्यक्ती म्हणजे इंडिया टीव्हीचे रजत शर्मा.

रजत शर्मा काय म्हणाले?

रजत शर्मा यांनी मंगळवारी आपल्या कार्यक्रमात गौतम गंभीरला खडे बोल सुनावले. शर्मा म्हणाले, ”निवडणूक लढवून खासदार झाल्यानंतर गौतम गंभीरचा अहंकार आणखी वाढला. विराटच्या लोकप्रियतेचा त्याला किती त्रास होतो, हे मैदानात पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आले.”

हेही वाचा – Health : ‘हे’ मासे खाल्ल्याने आरोग्य राहतं चागलं..! डाएटमध्ये करा समावेश

विराट कोहलीबद्दल बोलताना रजत शर्मा म्हणाले, की तो एक आक्रमक खेळाडू आहे आणि कोणत्याही प्रकारचा मूर्खपणा खपवून घेत नाही. त्यामुळेच त्याने गौतम गंभीरला सडेतोड उत्तर दिले. रजत शर्मा म्हणाले, ”गौतम गंभीरने जे केले ते खेळाडू भावनेच्या विरोधात आहे. मग तो माजी खेळाडू असो, वा खासदार. अशा घटनांमुळे क्रिकेटचे नुकसान होते आणि असे व्हायला नको होते.”

काय म्हणाला गौतम गंभीर?

रजत शर्मा यांनी स्पष्टपणे गंभीरवर ठपका ठेवला. यामुळे गंभीर देखील संतापला आणि त्यांना प्रत्युत्तर दिले. गंभीरने ट्विटरवर म्हटले, ”जो दबावाच्या बहाण्याने दिल्ली क्रिकेटपासून पळून गेला तो आता क्रिकेटची चिंता म्हणून पेड पीआर विकत आहे. हा कलियुग आहे जिथे ‘पळपुटे’ त्यांचे ‘अदालत’ चालवतात.”

रजत शर्मा ‘आप की अदालत’ हा शो होस्ट करतात. यावरून गंभीरचा संदर्भ शर्मा यांच्याकडे होता हे स्पष्ट होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment