WTC Final 2023 : टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली आहे आणि ही मालिका 2013 पासून आतापर्यंत सुरू आहे. रविवारी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गदा काबीज केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दणदणीत पराभवानंतर टीम इंडियाला सर्व बाजूंनी टीकेचा सामना करावा लागत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC फायनल) फायनलमध्ये भारताच्या दारुण पराभवानंतर माजी सलामीवीर गौतम गंभीरने टीम इंडियावर निशाणा साधला आहे आणि आपल्या एका विधानाने नवा वाद निर्माण केला आहे. एका खासगी वाहिनीशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, ”मला वाटते की अनेक लोक हे बोलणार नाहीत, पण हे सत्य आहे आणि जगासमोर यायला हवे. आपल्या देशाला संघाचे वेड नाही, तर संघातील मोठ्या खेळाडूंचे वेड आहे. आपण खेळाडूला संघापेक्षा मोठा मानतो. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर देशांमध्ये संघ मोठा आहे, खेळाडू नाही. हेच कारण आहे की आपण अजूनही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलो नाही, कारण आपल्याला संघापेक्षा एका खेळाडूचे वेड आहे.”
King words by gautam gambhir 🔥pic.twitter.com/eKJnhM23At
— Prayag (@theprayagtiwari) June 11, 2023
हेही वाचा – WTC Final 2023 : ट्रॉफी हुकली! मोठ्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणतो, “मला वाटतं…”
गौतम गंभीरने आपल्या वक्तव्यावरून विराट कोहली, रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांसारख्या बड्या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. गौतम गंभीरनेही आपल्या वक्तव्याने नव्या वादाला जन्म दिला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा सारखे मोठे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये फ्लॉप झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माला पहिल्या डावात केवळ 15 धावा आणि दुसऱ्या डावात 43 धावा करता आल्या. विराट कोहलीला पहिल्या डावात 14 आणि दुसऱ्या डावात 49 धावाच करता आल्या.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!