VIDEO : पान मसालाची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर गंभीरची सडकून टीका!

WhatsApp Group

Gautam Gambhir On Endorsing Pan Masala Brands : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने नुकत्याच न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ‘पान मसाला’च्या जाहिरातीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंवर टीका केली. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) दरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल हे खेळाडू प्रसिद्ध पान-मसाला ब्रँडची जाहिरात करताना दिसले. गंभीरने यापैकी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसले तरी, पान मसाल्याला मान्यता दिल्याबद्दल त्याने क्रिकेटपटूंना फटकारले आणि म्हटले की पैसे कमवण्याचे इतर मार्ग आहेत. गंभीरने याचे वर्णन “घृणास्पद आणि निराशाजनक” केले आहे.

गौतम गंभीरने न्यूज 18 या टीव्ही चॅनलशी संवाद साधताना सांगितले की, लाखो लोक या खेळाडूंना फॉलो करतात आणि मुले त्यांना आपला आदर्श मानतात. पण हे लोक काहीही विचार न करता पान मसाल्याचा प्रचार करत आहेत. गंभीरने दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबद्दल एक किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिनने ‘पान मसाला’ ची जाहिरात करण्यासाठी 20 कोटी रुपयांची आकर्षक ऑफर नाकारली होती.

हेही वाचा – महिंद्रा थार गाडी बनवण्यामागे या महिलेचा हात आहे, नक्की वाचा!

गौतम गंभीरने मुलाखतीत सांगितले की, “मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की एखादा क्रिकेटर पान मसाला जाहिरात करेल. हे खूप निराशाजनक आणि घृणास्पद आहे. म्हणूनच मी म्हणतो की तुमचा आदर्श हुशारीने निवडा. तुम्ही कोणते उदाहरण मांडत आहात. एखाद्याला त्याच्या नावाने नाही तर त्याच्या कामाने ओळखले जाते. करोडो मुलं तुम्हाला पाहत असतात. तुम्ही पान मसाल्याचा प्रचार करायला सुरुवात करता तेवढा पैसा महत्त्वाचा नसतो. पैसे कमवण्याचे इतरही बरेच मार्ग आहेत. तुम्हाला हे आवडले पाहिजे. हे असं काम करण्यापेक्षा मोठा चेक सोडण्याचे साहस पाहिजे.”

सचिन तेंडुलकरने त्याच्या वडिलांना दारू किंवा तंबाखूच्या कोणत्याही ब्रँडला मान्यता न देण्याचे वचन दिले होते, असे गंभीरने नमूद केले. यामुळे त्याने वार्षिक 20 ते 30 कोटी रुपयांची आकर्षक ऑफर नाकारली. सचिनचा हा निर्णय मुलांसाठी आदर्श असल्याचे गंभीरने म्हटले आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकरने अशा उत्पादनांची कधीही जाहिरात केली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment