बापरे…! झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटरवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्याने वाचवले प्राण

WhatsApp Group

Zimbabwe cricketer Guy Whittall Leopard Attack : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटॉल बिबट्याने हल्ला केल्याने जखमी झाला आहे. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली. त्याला एअरलिफ्टने हरारे येथे नेण्यात आले. गाय व्हिटॉलची पत्नी हॅना स्टोक्स व्हिटल हिने सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या पोस्टसोबतच तिने क्रिकेटरवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कृतज्ञता व्यक्त केली आणि हल्ल्यादरम्यान व्हिटॉलचे खूप रक्त गेल्याचेही तिने सांगितले. व्हिटॉल यांचा पाळीव कुत्रा चिकारा याने बिबट्याशी झुंज दिली. मात्र, चिकाराला बिबट्याने गंभीर जखमी केले असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.

गाय व्हिटलच्या पत्नीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तिने बिबट्याच्या हल्ल्याबाबत सांगितले तसेच रुग्णालयाचे आभारही मानले. ती म्हणाली, ”आम्ही खूप भाग्यवान आहोत की हिप्पो क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी त्याची इतकी चांगली काळजी घेतली. त्यानंतर त्याला बफेलो रेंजमधून हरारे येथे एअर ॲम्ब्युलन्सने नेण्यात आले, त्यानंतर त्याला मिल्टन पार्क रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. 2013 मध्ये, झिम्बाब्वेमधील हुमनी लॉजमध्ये त्याला त्याच्या पलंगाखाली 8 फूट लांबीची मगर आढळली. 150 किलो वजनाची मगर कोणाच्याही लक्षात न येता आत गेली आणि रात्रभर शांतपणे तिथेच पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी मोलकरणीच्या आरडाओरडामुळे घरात मगरी असल्याची माहिती सर्वांना लागली.

हेही वाचा – PPF Vs FD : इनकम टॅक्स वाचवण्यासाठी PPF की बॅँक एफडी, काय आहे बेस्ट ऑप्शन?

कारकीर्द

गाय व्हिटॉल झिम्बाब्वेकडून एक दशक खेळला. त्याने झिम्बाब्वेसाठी 46 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामने खेळले. 46 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 203 च्या सर्वोच्च स्कोअरसह 2207 धावा केल्या आणि 51 विकेट्सही घेतल्या. त्याच वेळी, त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2705 धावा आहेत आणि 88 विकेट्स घेण्यातही तो यशस्वी ठरला आहे. त्याचे कसोटी पदार्पण 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झाले होते. त्याचवेळी त्याने या वर्षी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2003 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसला होता.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment