MS Dhoni and Donald Trump : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2023 नंतर क्रिकेटपासून दूर आहे. क्रिकेटमधून बाहेर पडून तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो आणि मनमोकळेपणाने जीवनाचा आनंद लुटतो. माहीला चाहत्यांची कमी नाही. धोनी कुठेही गेला तरी त्याला भरभरून प्रेम मिळते.
आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील धोनीचे चाहते झाले आहेत. धोनी सध्या अमेरिकेत असून सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी माहीला गोल्फ खेळण्यासाठी बोलावले. ट्रम्प आणि धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
यूएस ओपन 2023 मध्ये धोनी
यूएस ओपन 2023 चा उपांत्यपूर्व सामना कार्लोस अल्काराज आणि झ्वेरेव्ह यांच्यात खेळला गेला. स्पेनच्या अल्काराझने हा सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना पाहण्यासाठी धोनीही पोहोचला होता. या सामन्याशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लांब केस वाढवलेला धोनी दिसत आहे.
हेही वाचा – आख्ख्या महाराष्ट्रासाठी खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ भारतात येणार
आयपीएल 2023 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचवे विजेतेपद जिंकून मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे. चेन्नईने माहीच्या नेतृत्वाखाली सर्व विजेतेपदे जिंकली आहेत. धोनी शेवटची आयपीएल खेळत होता, अशी अपेक्षा होती. पण फायनलनंतर तो म्हणाला होता की जर तो तंदुरुस्त राहिला तर तो आयपीएल 2024 मध्येही खेळेल.
धोनीची कारकीर्द
धोनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत, माहीने कसोटीत 4876 धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये 10773 धावा आणि टी-20 मध्ये 1617 धावा केल्या आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!