IPL खेळलेल्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! हॉटेलमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

WhatsApp Group

Sandeep Lamichhane Arrested : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछाने घरी येताच त्याला अटक करण्यात आली. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, संदीपला आज म्हणजेच गुरुवारी सकाळी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले.

संदीप लामिछाने याच्यावर काठमांडूमधील एका हॉटेलच्या खोलीत १७ वर्षीय तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. गौशाळा महानगर पोलीस सर्कलमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये किशोरवयीन मुलीने आरोप केला आहे की, २२ वर्षीय लामिछानेने ऑगस्टमध्ये हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. गोशाळा पोलीस वर्तुळात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, संदीप लामिछाने याने २१ ऑगस्ट रोजी मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेले. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. संदीप लामिछाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले.

हेही वाचा – राजू श्रीवास्तवनंतर अजून एका कॉमेडियनचा मृत्यू..! सुनील पाल म्हणाले, “कुणाची नजर…”

काठमांडू पोलिसांचे प्रवक्ते दिनेश मैनाली यांनी सांगितले होते की, जिल्हा न्यायालयाने पुढील तपासासाठी संदीप लामिछानेविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. जर संदीप नेपाळमध्ये नसेल तर काठमांडू पोलीस परदेशी एजन्सी किंवा इंटरपोलची मदत घेतील, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले होते. संदीपला गेल्या वर्षीच नेपाळच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment